'महाविकास आघाडीचे सरकार जास्त दिवस टिकणार नाही, शिवसेनेला मोठी किंमत मोजावी लागेल'

जनतेने शिवसेना आणि भाजप यांच्या युतीला कौल दिला होता - नितीन गडकरी

नवी दिल्ली । निवडणुकीत युती असलेल्या पक्षाला सोडून दुसऱ्या पक्षाशी आघाडी करून सत्ता स्थापन करणं लोकशाहीसाठी घातक आहे, असं सांगतानाच महाराष्ट्रातील काँग्रेस-शिवसेनेचं आघाडी सरकार जास्त दिवस चालणार नाही. आगामी काळात शिवसेनेला काँग्रेससोबत जाण्याची किंमत चुकवावी लागेल, असा इशारा भाजपचे नेते नितीन गडकरी यांनी दिला आहे. निवडणुकीपूर्वी एका पक्षाशी युती करायची आणि नंतर दुसऱ्या पक्षासोबत जायचे, ही बाब सैद्धांतिकदृष्ट्या योग्य नाही. तसेच ती लोकशाहीसाठीही मारक ठरणारी आहे.

विधानसभा निवडणुकीत शिवसेनेने भाजपशी युती केली होती. काँग्रेस आणि राष्ट्रवादीविरोधात मते मागितली होती. त्यामुळे जनतेने शिवसेना आणि भाजप यांच्या युतीला कौल दिला होता. तसेच जनतेने निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादीला नाकारले होते. तरीही केवळ मुख्यमंत्रिपदासाठी शिवसेनेने भाजपची साथ सोडली.AM News Developed by Kalavati Technologies