दुसऱ्यादिवशीही रुग्णालयातून राऊत सक्रिय, ट्विट केले 'अग्नीपथ अग्नीपथ अग्नीपथ...'

आज त्यांनी हरिवंशराय बच्चन यांच्या काही ओळी ट्विट केल्या.

मुंबई | शिवसेना खासदार संजय राऊत हे निवडणुकांचे निकाल लागले त्यानंतर पासून सतत चर्चेत आहे. दररोज काही ना काही ट्विट करून ते चर्चेत आहेत. रविवारी राऊतांची तब्येत बिघडल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्यावर अँजिओप्लास्टी झाली. मात्र रुग्णालयातूनही राऊत सक्रिय आहेत. त्यांनी सोमवारी सकाळी व आजही थेट लीलावतीमधून ट्विट केले आहे. शरिरावर एवढी मोठी शस्त्रक्रिया होऊनही संजय राऊत हार न मानता दररोज सूचक ट्विट करत आहेत. यासोबतच त्यांचे अग्रलेख लिहितानाचे फोटोही व्हायरल झाले होते.

संजय राऊत नेहमीच काही निवडक कवींच्या काही ओळी ट्विट करत राजकारण्यांना टोला वेगळ्याच शैलीत टोला लगावत असतात. मंगळवारी व आज त्यांनी हरिवंशराय बच्चन यांच्या काही ओळी ट्विट केल्या. संजय राऊतांनी आज फक्त 'अग्नीपथ अग्नीपथ अग्नीपथ' अवढेच सूचक ट्विट करून इशारा दिला आहे. या ट्विटवरून पुन्हा एकदा राजकीय चर्चांना उधाण आले आहे.

राऊत रुग्णालयात आहेत तरीही ते सक्रिय असताना दिसताय. मंगळवारी त्यांनी रुग्णालयाच्या बेडवरुन सामनासाठी अग्रलेख लिहिला. तसेच मंगळवारी सकाळीच त्यांनी ट्विट केले होते. . "लहरों से डर कर नौका पार नहीं होती, कोशीश करने वालों की कभी हार नही होती।' - बच्चन. हम होंगे कामयाब.. जरूर होंगे...' असे ट्विट केले होते. शिवसेनेला बहुमत सिद्ध करता आले नसले तरी आम्ही हार मानणार नाही, असा संदेश त्यांनी रुग्णालयातूनही दिला होता.AM News Developed by Kalavati Technologies