विरोधकांची भाषा घसरते तेव्हा त्यांच्या पायाखालची वाळू घसरलेली असते - रश्मी बागल

जवळपास सत्तर पंच्याहत्तर टक्के तालुका मी कव्हर केलेला आहे

करमाळा | राज्यभरात विधानसभा निवडणुकांचे वारे वाहत आहेत. नेत्यांनी प्रचारसभांचा धडाकाच लावला आहे. राज्यभरातील राजकीय वातावरण तापले आहे. विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात एकमेकांवर आरोप प्रत्यारोप होत असताना दिसत आहेत. दरम्यान कंदर येथील जाहीर सभेत शिवसेनेच्या रश्मी बागल यांचे भाषण झाले. जेव्हा विरोधकांची भाषा घसरते तेव्हा त्यांच्या पायाखालची वाळू घसरलेली असते असे म्हणत त्यंनी विरोधकांवर टीकास्त्र डागले.

रश्मी बागल बोलताना पुढे म्हणाल्या की, आपल्या नेत्याला बोलले की कुठल्याही कार्यकर्त्याला वाईट वाटते. पण तुम्ही एक लक्षात घेतले पाहिजे जेंव्हा मतदार संघात नसलेल्या अकोला, फुटजवळगाव गावातून गर्दी येथे गोळा करावी लागते. जे या मतदार संघात नाही जेव्हा विरोधकांची भाषा घसरण्याची कारण त्यांच्या पायाखालची वाळू घसरलेली असते. त्यामुळे याला उत्तर देण्याच्या आणि कधी टेन्शन घेण्याच्या भानगडीत पडू नका. जवळपास सत्तर पंच्याहत्तर टक्के तालुका मी कव्हर केलेला आहे अतिशय चांगला प्रतिसाद मिळत आहे. असा विश्वास त्यांनी यावेळी दर्शवला.

रश्मी बागल यांनी नुकताच राष्ट्रवादीचे घड्याळ सोडून हातात शिवबंधन बांधले. रश्मी बागल या कोण आहेत याविषयी सांगांयचे झाले तर. माजी मंत्री दिगंबरराव बागल यांच्या अकाली निधनानंतर त्यांच्या जागी रश्मी बागल यांच्या मातोश्री शामल बागल यांना राष्ट्रवादीने तिकीट देऊन 2009 मध्ये आमदार करण्यात आले. दिगंबरराव बागल यांनी शरद पवारांच्या मंत्रिमंडळातही काम केलेल होते. करमाळा विधानसभेला 2009 मध्ये माढा तालुक्यातील 36 गावे जोडली गेली. राष्ट्रवादीने 2000 च्या निवडणुकीमध्ये रश्मी बागल यांना उमेदवारी दिली होती. पण अवघ्या 253 मतांनी त्यांना पराभूत व्हावे लागले होते. आदिनाथ आणि मकाई या साखर कारखान्यांवर त्यांची सत्ता आहे. आता त्यांना शिवसेनेचे तिकीट मिळाले आहे.AM News Developed by Kalavati Technologies