शिवसेनेचे प्रकाश अबीटकर यांच्या नावे आलेल्या पार्सलचा हुबळी रेल्वे स्थानकात स्फोट

राधानगरीचे आमदार प्रकाश अबीटकर यांची सखोल चौकशीची मागणी

कोल्हापूर । हुबळी रेल्वे स्थानकावर झालेल्या स्फोटाचं कोल्हापूर कनेक्शन उघड झालं आहे. काल दुपारी हा स्फोट झाला होता. कोल्हापूर जिल्ह्यातील राधनगरी मतदार संघाचे शिवसेनेचे आमदार प्रकाश आबिटकर यांच्या नावाने आलेल्या पार्सलचा स्फोट झाल्याचं समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे.

काल दुपारी हुबळी रेल्वे स्थानकावर एका पार्सलचा स्फोट होऊन एक जण जखमी झाला होता. याप्रकरणी कर्नाटक पोलिसांनी तपास सुरू केल्यानंतर प्रकाश आबिटकर यांच्या नावाने आलेल्या पार्सलचा स्फोट झाल्याचं समोर आलं. प्रकाश अबीटकर हे कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी विधानसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे विद्यमान आमदार असून त्यांच्या नावे हे पार्सल आल्याचं पोलीस तपासात समोर आल आहे. दरम्यान, महाराष्ट्र विधानसभेसाठी काल मतदान झालं आणि या दरम्यान हा स्फोट झाल्याने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली. दरम्यान आज प्रकाश आबिटकर यांनी कोल्हापूरचे पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख यांची भेट घेऊन या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली.

कोल्हापूरात गेल्या दोन दिवसांपूर्वीच कोल्हापुरात पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गावर ती उड्डाणपुलांच्या खाली असाच एक स्फोट झाला होता. याचा पोलीस तपास करत असताना अचानकच हुबळीमध्ये झालेल्या स्फोटाचं कोल्हापूर कनेक्शन पाहता कोल्हापूर पोलिसांची वरिष्ठ अधिकाऱ्यांची एक टीम कर्नाटक कडे रवाना केली आहे. ते कर्नाटक पोलिसांकडून यासंदर्भात माहिती घेत असल्यास कोल्हापूरचे पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख यांनी सांगितलं

एकूणच मतदाना दिवशी झालेल्या स्फोटानंतर शिवसेनेचे आमदार प्रकाश आबिटकर यांच्या कार्यकर्त्यांचे धाबे दणाणले आहेत. हे पार्सल प्रकाश आबिटकर यांच्या नावे कोणी पाठवलं ? कुठून पाठवलं ? या मागचा हेतू काय ? याचा पोलीस शोध घेत आहेत.AM News Developed by Kalavati Technologies