संजय राऊतांनी घेतली शरद पवारांची भेट, 'या' विषयावर झाली चर्चा

यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये संजयांनी शरद पवारांची भेट घेतली.

मुंबई | शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली आहे. यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये संजयांनी शरद पवारांची भेट घेतली. त्यांच्या या भेटीमागे राज्यसभा निवडणुकीविषयी चर्चा झाल्याचे वृत्त आहे. महाविकास आघाडी आणि राज्यसभेच्या जागांवरून दोघांमध्ये झाली चर्चा झाल्याचे वृत्त आहे. राज्यसभेच्या दोन जागा राष्ट्रवादी तर प्रत्येकी एक जागा सेना आणि काँग्रेस लढवणार असल्याचे वृत्त आहे.

राज्यसभेसाठी काँग्रेसकडून उमेदवारांची घोषणा लवकरच करण्यात येऊ शकते. काँग्रेसच्या अंतरिम अध्यक्षा सोनिया गांधी यांची काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी भेट दिल्यानंतर ही माहिती दिली. राज्यात महाविकास आघाडी चौथा उमेदवार एकत्रितपणे ठरवेल असे थोरात यांनी सांगत राष्ट्रवादीला सूचक इशारा दिला आहे. दरम्यान, फौजिया खान यांच्या उमेदवारीमुळे राष्ट्रवादी दोन जागा लढणार अशी चर्चा होती.AM News Developed by Kalavati Technologies