शिवसेनेच्या वतीने पंढरपूरात शेतकरी मदत केंद्र सुरु

योजनांचा लाभ शेतकऱ्यांना मिळवून देण्यासाठी हे मदत केंद्र सुरु करण्यात आले आहे

पंढरपूर । शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राज्यातील शेतकऱ्यांवर कोसळलेल्या आस्मानी संकटाच्या वेळी शेतकऱ्यांना मदत व्हावी यासाठी राज्यात सर्वत्र शेतकरी मदत केंद्राची स्थापना करावी असे आदेश दिले होते. यानुसार पंढरपूरात शिवसेनेच्या वतीने शेतकरी मदत केंद्र सुरु करण्यात आले आहे. या केंद्राचे उदघाटन माजी जिल्हा प्रमुख साईनाथ अभंगराव यांच्या हस्ते करण्यात आले.

महाराष्ट्रावर यावर्षी मोठे आस्मानी संकट कोसळले आहे. सुरुवातीला पावसाने ओढ दिल्याने राज्यातील खरिपाच्या पेरण्या लांबल्या त्यामुळे नुकसान झाले तर पुढे राज्यात सर्वत्र अतिवृष्टी झाल्याने मोठे नुकसान सहन करावे लागले. परतीच्या पावसाने हातातोंडाशी आलेले पिके नेल्याने शेतकरी उध्वस्त झाला आहे. या शेतकऱ्यांना मदत व्हावी यासाठी हे शेतकरी मदत सुरु करण्यात आले असून अवकाळी पावसाने झालेले नुकसान, अतिवृष्टीमूळे झालेले नुकसान, पीक विम्याचे प्रश्न, कर्जमाफीचे प्रश्न यासह प्रधानमंत्री किसान सन्मान योजना आदींचा लाभ शेतकऱ्यांना मिळवून देण्यासाठी हे मदत केंद्र सुरु करण्यात आलेले आहे. अशी माहिती शिवसेना जिल्हा प्रमुख संभाजी शिंदे यांनी दिली. या शेतकरी मदत केंद्रातून विविध लाभ घेण्यासाटी आकाश जयवंत माने मोबा . ७०५७८२६३३३ याच्याशी संपर्क करावा असे आवाहन करण्यात आले आहे.AM News Developed by Kalavati Technologies