धुळे शहरात पाच रुपात शिवभोजन उपलब्ध

सुमारे 400 लोकांना जेवणाची व्यवस्था करून दिली आहे

धुळे | कोरोना व्हायरस मुळे संपूर्ण देशात लॉक डाऊन सुरु असल्यामुळे शहरातील हॉस्पिटल मध्ये दाखल रुग्ण व त्यांचे नातेवाईक, गरीब,गरजू व मजुरी, रोजंदारी करणाऱ्या जनतेच्या जेवणाची गैरसोय लक्षात घेवून त्यांच्या जेवणाची सोय व्हावी म्हणून महाराष्ट्र शासनाने आता धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यातही पाच रुपयात शिवभोजन उपलब्ध करून दिले आहे.

शिरपूर शहरातील मार्केट कमिटी, महाराजा कॉम्प्लेक्स, मांडळ रोड या ठिकाणी पाच रुपयात शिवभोजनाचे उद्घाटन शिरपूर वरवाडे नगरपालिकेच्या नगराध्यक्षा जयश्रीबेन पटेल यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आमदार काशिराम पावरा, उपनगराधक्ष्य भुपेश पटेल, नगरसेवक तपन पटेल, प्रांत विक्रम बांदल, तहसीलदार आबा महाजन, मुख्याधिकारी अमोल बागुल उपस्थित होते.

शहरातील महाराजा कॉम्प्लेक्स मध्ये माजी मंत्री अमरिषभाई पटेल यांनी पप्पाजिकी थाली सुरू केली असून या ठिकाणी देखील नाममात्र पाच रुपयात सुमारे 400 लोकांना जेवणाची व्यवस्था करून दिली आहे.AM News Developed by Kalavati Technologies