25 मेपासून सुरू होणार शिर्डी - हैद्राबाद विमानसेवा

25 मे पासून हैद्राबाद ते शिर्डी आणि शिर्डी ते पुन्हा हैद्राबाद अशी विमानसेवा सुरू होणार आहे.

अहमदनगर | कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या लॉकडाऊनमुळे आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत विमानसेवा बंद करण्यात आली होती. मात्र आता चौथ्या लॉकडाऊनमध्ये ठप्प असलेली विमानसेवा पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतलाय. त्याच अनुषंगाने इंडिगो एअरलाईन ने DGCकडे प्रस्ताव पाठवून हैद्राबाद ते शिर्डी अशी विमान सेवा सुरू करण्याची तयारी दर्शवली आहे.

25 मे पासून हैद्राबाद ते शिर्डी आणि शिर्डी ते पुन्हा हैद्राबाद अशी विमानसेवा सुरू होणार आहे. त्यासाठी बुकिंग देखील सुरू झाल्याची माहिती शिर्डी विमानतळाचे डायरेक्टर दिपक शास्त्री यांनी दिली आहे. तसेच स्पाईसजेट आणि एअर इंडिया यांच्याकडून अद्याप कोणतीही विचारणा झालेली नाही. तसा प्रस्ताव आल्यास त्याही फ्लाईट सुरू होऊ शकतात असं शस्त्री म्हणाले. तर हैद्राबाद- शिर्डी हे इंडिगो एअरलाईनचे ATR - 72 हे विमान 70 आसनी आहे. ज्यांना दिल्ली, चेन्नई किंवा मुंबईला जायचे असेल ते प्रवासी देखील व्हाया हैद्राबाद जाण्यासाठी या विमानसेवेचा लाभ घेवू शकणार आहेत.AM News Developed by Kalavati Technologies