शिल्पा शेट्टी दुसऱ्यांदा झाली आई, गोंडस मुलीचा झाला जन्म

शिल्पा आणि राज यांच्यावर सोशल मीडियावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे

मुंबई | अभिनेत्री शिल्पा शेट्टीनेने आपल्या चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे. शिल्पा शेट्टी दुसऱ्यांदा आई झाली आहे. तिने अचानक दिलेल्या या बातमीने सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. सरोगसीद्वारे शिल्पा शेट्टीने मुलीला जन्म दिला आहे. शिल्पाने इन्स्टाग्रामवर आपल्या मुलीचा फोटो शेअर केला. हा फोटो शेअर केल्यानंतर शिल्पावर शुभेच्छांचा वर्षाव होतोय.

शिल्पाने या फोटोसोबत आपल्या मुलीचे नावंही सांगितले आहे. तिने आपल्या मुलीचे नाव समीशा ठेवले आहे. शिल्पाने समीशाचा फोटो इन्स्टग्रावर शेअर केलं आणि तिचं स्वागत केलं आहे. अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि नवरा राज कुंद्रा यांना पहिला विहान नावाचा एक मुलगा आहे. तो 7 वर्षांचा आहे. 7 वर्षानंतर शिल्पाने आई होण्याचा निर्णय घेतला. मात्र यावेळी तिने सरोगसीच्या मदतीने समीशाला जन्म दिला. चाहत्यांसोबतच सर्व स्तरातून शिल्पा आणि राज यांचं अभिनंदन केलं जात आहे.

View this post on Instagram

|| Om Shri Ganeshaya Namah || Our prayers have been answered with a miracle... With gratitude in our hearts, we are thrilled to announce the arrival of our little Angel, ???????????????????????????????? ???????????????????????? ???????????????????????????? Born: February 15, 2020 Junior SSK in the house???? ‘Sa’ in Sanskrit is “to have”, and ‘Misha’ in Russian stands for “someone like God”. You personify this name - our Goddess Laxmi, and complete our family. ⠀⠀⠀⠀⠀⠀⠀⠀⠀ ⠀⠀⠀⠀⠀⠀⠀⠀⠀ ⠀⠀⠀⠀⠀⠀ ~ Please bestow our angel with all your love and blessings????????❤ ~ Ecstatic parents: Raj and Shilpa Shetty Kundra Overjoyed brother: Viaan-Raj Kundra . . . . . . . . . #SamishaShettyKundra???? #gratitude #blessed #MahaShivratri #daughter #family #love

A post shared by Shilpa Shetty Kundra (@theshilpashetty) on



AM News Developed by Kalavati Technologies