शेषनाग आता भारतातली सर्वात मोठी रेल्वे

शेषनाग ट्रेनची लांबी २.८ किलोमीटर, सुपर अॅनाकोंडाचाही तोडला रेकॉर्ड

नागपूर । भारतीय रेल्वेने गुरुवारी पुन्हा एकदा इतिहास रचला आहे. शेषनाग ही देशातली मालवाहतुक करणारी सर्वात मोठी लांबीची रेल्वे बनली आहे. नागपूर ते कोरबापर्यंत २६० किलोमीटर अंतर या शेषनाग मालवाहतुक रेल्वेने अवघ्या 6 तासात पार हे केले आहे. यात २६१ डब्बे असुन, ४ मालगाडी एकत्र करून हि शेषनाग चालवण्यात आली. त्यामुळे आता हि भारतातली सर्वात मोठी लांबीची मालवाहतुक करणारी रेल्वे बनली आहे. सुपर अॅनाकोंडा गटातली आता सर्वात मोठ्या रेल्वेचा मान शेषनागला मिळाला आहे. दक्षिण पूर्व मध्य रेल्वे कडून नागपूर ते कोरबा दरम्यान ट्रेन चालवली गेली. याअगोदर भारतीय रेल्वेने सुपर अॅनाकोंडा रेल्वे १.९ किलोमीटर लांबीची ट्रेन चालवली होती. ज्यात १५१ डब्बे जोडलेले होते.AM News Developed by Kalavati Technologies