कोरोनाचा प्रभाव : शेअर बाजार गडगडला, 1900 अंकांनी कोसळला सेंसेक्स

सुरुवातीला सेंसेक्स 1900 अंकांनी कोसळून 34,000 अंकांखाली आला.

नवी दिल्ली | कोरोना व्हायरसचा प्रभाव भारतासह जगभरातील शेअर बाजारवर झाला आहे. आठवड्याच्या चौथ्या दिवशी गुरुवारी भारतीय शेअर बाजाराच्या सुरुवातीला पुन्हा एकदा कोसळला आहे.

सुरुवातीला सेंसेक्स 1900 अंकांनी कोसळून 34,000 अंकांखाली आला. तर निफ्टी 550 पेक्षाही जास्त अंकांनी कोसळून 9,900 वर पोहोचला आहे. सुरुवातीच्या व्यवसायात बीएसई इंडेक्सचे सर्व 30 शेअर लाल निशाणावर होते. टाटा स्टीलमध्ये सर्वात जास्त 9 टक्क्यांनी घसरण झाली आहे. तर एशियन पेंटच्या शेअरमध्येही जवळपास 2 टक्के घसरण झाली.

गुरुवारी सकाळच्या सत्रात व्यवहाराला सुरुवात झाली. तेव्हाच शेअर बाजारात मोठी घसरण झाली. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स तब्बल 1700 पेक्षा जास्त अंकांनी कोसळला आहे. राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीमध्ये सुद्धा 500 अंकांची घसरण झाली आहे.

अमेरिकेचीही परिस्थिती भारतीय शेअर बाजारची झाली आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी अमेरिकी शेअर बाजार सूचकांक डाऊ जोन्स 1400 अंकांनी कोसळला आणि 23,553.22 अंकांवर बंद झाला. ही डाऊ जोन्सची सर्वात मोठी घसरण असल्याचे बोलले जात आहे.AM News Developed by Kalavati Technologies