अजित पवारांच्या भूमिकेवर शरद पवारांची प्रतिक्रिया

अजित पवारांच्या नाराजीचं कारणही अद्याप गुलदस्त्यात

मुंबई । काँग्रेस-राष्ट्रवादी समन्वय समितीच्या बैठकीपूर्वीच काही तरी बिनसल्याने राष्ट्रवादीचे विधिमंडळ गटनेते अजित पवार प्रचंड वैतागले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना भेटल्यानंतर ते तडकाफडकी बारामतीच्या दिशेने निघाले. समन्वय समितीची बैठकही रद्द झाल्याचं त्यांनी वैतागून सांगितल्याने राष्ट्रवादी काँग्रेस अंतर्गत काही तरी वाद निर्माण झाल्याचं सांगण्यात येतं असून अजितदादांच्या नाराजीचं कारणही अद्याप गुलदस्त्यात आहे. अजित पवार बारामतीमध्ये जातो म्हणून निघून गेल्याच्या वृत्तावर खुद्द राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. अजित पवार हे मुंबईतच आहेत. उद्या तुम्हाला ते दिसतील असे शरद पवार यांनी म्हटले आहे. बैठक रद्द झाल्याचे त्यांनी चेष्ठेने म्हटले असेल, असेही पवार यांनी सांगितलेAM News Developed by Kalavati Technologies