कृषी विधेयकांवरून शरद पवारांचा मोदी सरकारवर निशाणा, निलंबित खासदारांच्या पाठिंब्यासाठी एक दिवस अन्नत्याग आंदोलन

कृषी विधेयकाला विरोध करणाऱ्या आठ खासदारांच्या पाठिंब्यासाठी शरद पवार करणार आज अन्नत्याग आंदोलन

मुंबई । संसदेच्या कामकाजाचा आजचा 9 वा दिवस आहे. केंद्र सरकारने बहुमताच्या जोरावर कृषी विधेयके मंजूर करून घेतली असून या मुद्द्यावर राष्ट्रवादी काँग्रेसने आक्रमक भूमिका घेतली आहे. राज्यसभेत कृषी विधेयकाला विरोध केल्याप्रकरणी राज्यसभेच्या 8 खासदारांना निलंबित करण्यात आले. त्या पार्श्वभुमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी एक दिवस अन्नत्याग आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारच्या कृषी विधेयकाला राज्य सभेत जोरदार विरोध करण्यात आला. तसेच 8 खासदारांना निलंबित करण्यात आले. त्यामुळे काँग्रेससह विरोधीपक्ष आक्रमक झाले आहे. सदरील खासदारांचे निलंबन मागे न घेतल्यास संसदेच्या उर्वरित कामकाजावर बहिष्कार टाकण्याचा इशारा विरोधकांनी दिला आहे. आज मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत पवार यांनी निलंबत खासदारांसाठी आपण स्वत: आज दिवसभर उपोषण करणार असल्याचं म्हटलं आहे.



AM News Developed by Kalavati Technologies

A PHP Error was encountered

Severity: Core Warning

Message: PHP Startup: Unable to load dynamic library 'ftp.so' (tried: /RunCloud/Packages/php72rc/lib/php/extensions/no-debug-non-zts-20170718/ftp.so (/RunCloud/Packages/php72rc/lib/php/extensions/no-debug-non-zts-20170718/ftp.so: cannot open shared object file: No such file or directory), /RunCloud/Packages/php72rc/lib/php/extensions/no-debug-non-zts-20170718/ftp.so.so (/RunCloud/Packages/php72rc/lib/php/extensions/no-debug-non-zts-20170718/ftp.so.so: cannot open shared object file: No such file or directory))

Filename: Unknown

Line Number: 0

Backtrace: