औरंगाबादेत आणखी सात कोरोनाबाधितांची वाढ, सहा जणांचा मृत्यू

जिल्ह्यात आतापर्यंत 519 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे

औरंगाबाद | जिल्ह्यातील सात रुग्णांचे अहवाल दुपारी पॉझिटिव्ह आले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 15 हजार 877 एवढी झाली आहे. त्यापैकी 11 हजार 676 बरे झाले तर 519 जणांचा मृत्यू झाला असल्याने सध्या 3682 जणांवर उपचार सुरु असल्याचे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे. जिल्ह्यातील भागनिहाय रुग्ण तपशील पुढीलप्रमाणे (कंसात रुग्ण संख्या)

ग्रामीण (04 )

वाळूज पोलिस स्टेशन परिसर (01), सारा गौरव, बजाज नगर (01), म्हाडा कॉलनी, पैठण (01), बीएसएनएल गोडाऊन जवळ, बजाज नगर (01)

मनपा (03)

हिंदुस्तान आवास, कांचनवाडी (02), रोपळेकर हॉस्पिटल परिसर (01)

सहा कोरोनाबाधितांचा मृत्यू

घाटीत बजाज नगर, जय भवानी चौकातील 27 वर्षीय पुरुष, हडको टीव्ही सेंटर येथील 61 वर्षीय स्त्री, एन अकरा हडकोतील 65 वर्षीय पुरुष आणि खासगी रुग्णालयांमध्ये टीव्ही सेंटर येथील 69, गंगापूर येथील 70 व शिवाजी नगर, गारखेडा येथील 71 वर्षीय पुरुष कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.AM News Developed by Kalavati Technologies