कल्याणमध्ये क्षुल्लक वादातून वाईनशॉप मालकावर कैचीने हल्ला

कल्याण-मुरबाड रोडवरील रोज नावाच्या वाईनशॉप मालकावर किरकोळ वादातून कैचीने वार केला आहे

कल्याण । कल्याण जवळ असलेल्या मुरबाड रोडवरील म्हारळ गावात रोज नावाच्या वाईनशॉप मालकावर किरकोळ वादातून कैचीने वार केल्याची घटना घडली आहे. सोमवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास एक इसम वाईनशॉपमध्ये दारू घेण्यासाठी आला होता. मात्र दारु खरेदी केल्यानंतर वाईनशॉप मालक धर्मपाल सिंह यांनी 500 रुपयांवरून हटकले. वाईनशॉप मालक व इसमामध्ये वाद झाला आणि रागाच्या भरात तो इसम घरी निघून गेला. संतापलेला इसम काही वेळाने कैची आणि हथोडा घेऊन पुन्हा दुकानावर आला व त्याने पुन्हा हुज्जत घालण्यास सुरुवात केली.

हुज्जत सुरू असतानाच त्या इसमाने अचानक कैचीने वाईनशॉप मॅनेजर लच्छू आहूजा व मालक धर्मपाल सिंह यांच्यावर वार करण्यास सुरुवात केली. या हल्ल्यात वाईनशॉप मॅनेजर जखमी झाले असून, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहे. हा संपूर्ण प्रकार वाईनशॉपच्या सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झाला आहे. याप्रकरणी टिटवाळा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी पुढील तपास सुरू करत सीसीटीव्हीच्या मदतीने आरोपी ग्राहकाचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे.AM News Developed by Kalavati Technologies