सातारा ब्रेकिंग : साताऱ्यात पुन्हा 196 कोरोनाबधितांची भर; रुग्णसंख्या पोहोचली 4976 वर

सध्या जिल्ह्यात 2475 रुग्णांवर उपचार सुरू, तर 2349 रुग्णांनी केली कोरोनावर मात

सातारा । सातारा जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतच चालला आहे. आज पुन्हा 196 रुग्णांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा हा 4976 वर पोहोचला आहे. तर आज 62 जणांना सुट्टी देण्यात आली असून, आतापर्यंत 2349 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. सध्या जिल्ह्यात 2475 रुग्णांवर उपचार सुरू आहे. तर 147 जणांचा उपचारादरम्यान कोरोनामुळे मृत्यू झाले आहे.AM News Developed by Kalavati Technologies