सातारा जिल्ह्यात आणखी 52 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह, एकूण संख्या 394 वर

आता सातारा जिल्हयात कोरोना बाधित रुग्णांची संख्या 394 एवढी झाली आहे.

सातारा | राज्यभरात कोरोना रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे. दरम्यान सातारा जिल्ह्याला आणखी मोठा झटका बसला आहे. येथे नव्या 52 जणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. तर एका बाधिताचा मृत्यू झाला आहे. 12 तासात 58 रुग्ण वाढल्यामुळे जिल्हयाची चिंता वाढली आहे.

आता सातारा जिल्हयात कोरोना बाधित रुग्णांची संख्या 394 एवढी झाली आहे. वाई तालुक्यातील आसले येथील 67 वर्षीय व्यक्ती आणि पाटण तालुक्यातील जांभेकरवाडी येथील 70 वर्षीय व्यक्तीचा कोरोना संसर्गाने मृत्यू झाला आहे. जिल्हयात आतापर्यंत 11 कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. जिल्हयात सद्यस्थितीला 255 कोरोना बाधित रुग्णांवर उपचार सुरु आहेत. जिल्हयात आतापर्यंत 126 जण कोरोना मुक्त झाले आहेत.AM News Developed by Kalavati Technologies