कोरोना व्हायरसशी दोन हात करण्यासाठी शिवसैनिक पुढे सरसावले, संजय राऊतांचे ट्विट 

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी या संदर्भात एक ट्विट केले आहे.

मुंबई | देशभरात कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव वाढताना दिसतोय. तर महाराष्ट्रात कोरोनाचे सर्वातधिक रुग्ण आढळले आहेत. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 21 दिवसांसाठी देशभरात लॉकडाउनची घोषणा केली आहे. दरम्यान देशभरात कोरोनाचे रुग्ण सातत्याने वाढत आहेत. याच काळात देश बंद असल्यामुळे अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. आता या कोरोनाशी दोन हात करण्यासाठी शिवसैनिक पुढे सरसावले आहेत. 

शिवसेनेचे सर्व खासदार आणि आमदार एक महिन्याचे वेतन मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी देणार आहेत. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी या संदर्भात एक ट्विट केले आहे. 'शिवसेनेचे सर्व खासदार आणि आमदार एक महिन्याचे वेतन मुख्यमंत्री सहाय्यता निधीस देत आहेत. कोरोना वायरस विरुध्दच्या लढाईत हा खारीचा वाटा आहे. मुख्यमंत्री ऊदधव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली हे युद्ध आपण नक्की जींकू.' असे ट्विट संजय राऊतांनी केले आहे. AM News Developed by Kalavati Technologies