मध्यप्रदेशचा व्हायरस महाराष्ट्रात घुसणार नाही, चिंता नसावी - संजय राऊत

महाविकास आघाडीने बायपास ऑपरेशन करून महाराष्ट्र वाचवला - संजय राऊत

मुंबई | मध्य प्रदेशातील कमलनाथ सरकारवर सध्या संकट कोसळले आहे. ज्योतिरादित्य सिंधिया यांनी काँग्रेसचा राजीनामा दिला. त्यांच्यासोबत 22 आमदारांनीही काँग्रेसला रामराम ठोकला. यामुळे आता येथील काँग्रेस सरकार संकटात आले आहे. ज्योतिरादित्य संधिया हे लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार आहे. यानंतर येथे भाजप सरकार स्थापन होण्याची शक्यता आहे. दरम्यान संजय राऊतांनी महाराष्ट्रातील परिस्थितीविषयी ट्विट केले आहे. मध्य प्रदेशातील व्हायरस महाराष्ट्रात घुसणार नाही, चिंता नसावी असे ट्विट संजय राऊतांनी केले आहे.

मध्य प्रदेशातील काँग्रेस सरकार ज्या प्रमाणे पडले अगदी त्याच प्रमाणे महाराष्ट्रातही घडेल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. यावर संजय राऊतांनी ट्विट केले. महाराष्ट्राची 'पाॅवर' वेगळी आहे. एक ऑपरेशन शंभर दिवसापूर्वी फसले आहे.त्यानंतर महाविकास आघाडीने बायपास ऑपरेशन करून महाराष्ट्र वाचवला.मधयप्रदेशचा वायरस महाराष्ट्रत घुसणार नाही. चिंता नसावी. असे ट्विट राऊतांनी केले.AM News Developed by Kalavati Technologies