सॅमसंगचा जबरदस्त फोन Galaxy M31s भारतात लाँच, जाणून घ्या खास वैशिष्टे

सॅमसंगने आज आपल्या प्रसिद्ध गॅलेक्सी एम सीरीज अंतर्गत एक नवीन स्मार्टफोन Galaxy M31s भारतात लाँच केला आहे.

नवी दिल्ली | सॅमसंगने आज आपल्या प्रसिद्ध गॅलेक्सी एम सीरीज अंतर्गत एक नवीन स्मार्टफोन Galaxy M31s भारतात लाँच केला आहे. हा फोन काही महिन्यांपूर्वी लॉन्च झालेल्या सॅमसंग गॅलेक्सी एम 31 ची अपग्रेड केलेली आवृत्ती आहे. सॅमसगच्या एम सीरिजच्या या फोनमध्ये 6.5 इंचाचा फुल एचडी प्लस इन्फिनिटी डिस्प्ले, याशिवाय यात सॅमसंगचा एक्सीनोस 9611 प्रोसेसर आहे ज्याची क्लॉक स्पीड 2.3 गीगाहर्ट, 8 जीबी रॅम आणि 128 जीबी पर्यंत स्टोरेज उपलब्ध करुन देण्यात आलं आहे. 20,000 रुपयांच्या रेंजमध्ये मोठा डिस्प्ले आणि 6000 एमएएच बॅटरी, देण्यात आली आहे. फोनचा पहिला सेल 6 आणि 7 ऑगस्ट रोजी अ‍ॅमेझॉनवर होणार आहे.

जबरदस्त फीचर्ससोबत होणार लाँच

सॅमसंगचा हा फोन मिड रेंज सेगमेंटमध्ये अनेक फीचर्ससोबत एन्ट्री करणारा आहे. कंपनीने अ‍ॅमेझॉनवर या फोनची एक मायक्रो वेबसाइट लाइव्ह केली आहे. या मायक्रोसाइट मध्ये फोनचे काही वैशिष्ट्ये दाखवले आहेत. फोनचे सर्वात मोठे वैशिष्ट्ये म्हणजे यात 6000mAh बॅटरी दिली आहे. फोन 25 वॉट फास्ट चार्जिंग आणि रिव्हर्स चार्जिंग सपोर्ट सोबत येते.

8 जीबी रॅम आणि Exynos प्रोसेसर

सॅमसंग गॅलेक्सी M31s मध्ये मोठा सुपर AMOLED डिस्प्ले मिळू शकतो. जो फुल एचडी रिझॉल्यूशन सोबत येईल. डिस्प्लेच्या टॉप सेंटरमध्ये फ्रंट कॅमेऱ्यासाठी पंच होल डिस्प्ले दिला आहे. फोन 8 जीबी रॅम प्लस 128 जीबी इंटरनल स्टोरेजसोबत येईल. या फोनचा एक 6 जीबी रॅम प्लस 128 जीबी इंटरनल स्टोरेजचा व्हेरियंट सुद्धा कंपनी लाँच करू शकते. सॅमसंग या फोनमध्ये Exynos 9611 चिपसेट देण्याची शक्यता आहे.AM News Developed by Kalavati Technologies