'सेक्रेड गेम्स 2' पाहण्यासाठी आतुर झाले प्रेक्षक, ट्रेलर झाला प्रदर्शित

15 ऑगस्टला ही सीरिज प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

एएम न्यूज | नेटफ्लिक्स वरील बहुप्रतिक्षित वेब सीरीज सेक्रेड गेम्स-2 चा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. हा ट्रेलर पाहून यंदा एन्टटेन्मेंटचा डबल डोज मिळणार हे स्पष्ट आहे. पुन्हा एकदा असंख्य प्रश्नांचा काहूर माजवण्याचे काम या ट्रेलरने केले आहे. त्यामुळे आता कधी एकदा वेब सीरिज प्रदर्शित केली जाते, याचीच उत्सुकता प्रेक्षकांमध्ये आहे. 15 ऑगस्ट रोजी 'सेक्रेड गेम्स 2'चे प्रीमियम होणार आहे.

'गणेश गायतोंडे', 'बंटी', 'सरताज' यांचा तोच अंदाज या ट्रेलरमधून दिसतोय सोशल मीडियावर त्यांना खूप पसंती मिळत आहे. सेक्रेट गेम्सच्या ट्रेलरविषयी लोक खूप उत्साहित आहेत. पहिल्या सीजनमध्ये गणेश गायतोंडेचे संवाद खूप प्रसिद्ध झाले होते. सोशल मीडियावर आजही याचे मीम्स येत असतात. दूसऱ्या सीजनमध्येही गायतोंडेच्या वाट्याला बोल्ड संवाद आहेत.

कल्की कोचलीन, रणवीर शौरी आणि पंकज त्रिपाठी यांच्या भूमिकाही यामध्ये आहेत. आता ते साकारत असणारी पात्र या खेळाला नेमकं कोणत्या वळणावर नेणार हे जाणुन घेणं महत्त्वाचे असणार आहे. 15 ऑगस्टला ही सीरिज प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. प्रभावी आणि प्रेक्षकांच्या पचनी पडतील असे संवाद, पार्श्वसंगीत आणि अर्थातच प्रेक्षकांचा दमदार अभिनय यामुळे ट्रेलर आणखी प्रभावी झाला आहे.

Sacred Games Season 2 Official Trailer outAM News Developed by Kalavati Technologies