उपमुख्यमंत्री पदावरून सचिन पायलट यांची हकालपट्टी

सचिन पायलट यांना राजस्थानच्या प्रदेशाध्यक्ष पदावरून हटवलं


जयपूर । राजस्थानमध्ये सुरू असलेल्या राजकीय वर्तुळात एक नवीन ट्विस्ट आला आहे. राजस्थानमध्ये काँग्रेसने एक मोठा निर्णय घेतला आहे. बहुमत सिद्ध करण्याचा आवाहन देणाऱ्या सचिन पायलट यांची उपमुख्यमंत्री पदावरून हकालपट्टी करण्यात आली आहे. तसेच राजस्थान काँग्रेस प्रदेश अध्यक्ष पदावरून सुद्धा त्यांना हटवण्यात आलं आहे. सचिन पायलट सोबत असलेल्या तीन आमदारांचे सुद्धा मंत्रीपद काढून घेण्यात आले आहे. उपमुख्यमंत्री पदावरून सचिन पायलट यांना काढून त्यांच्याजागी आता गोविंद सिंह यांना उपमुख्यमंत्री पद देण्यात आले आहे. काँग्रेसचे प्रवक्ते रणदिप सुरजेवाला यांनी ही माहिती दिली आहे.AM News Developed by Kalavati Technologies