पळपुट्यांचा लोक समाचार घेतीलः शरद पवार

27 वर्षे मी विरोधी पक्षात होतो

मुंबई । पक्ष सोडून जाणाऱ्यांवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार निशाणा साधला. पळपुटेपणाची भूमिका घेणाऱ्यांचा लोक योग्य समाचार घेतील, असा टोला त्यांनी लगावला. नवी मुंबईत आयोजित कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते. मी मागील 52 वर्षांपासून कोणत्या ना कोणत्या सभागृहात आहे. यातील 27 वर्षे मी विरोधी पक्षात होतो. पण काम करताना मला कोणतीही अडचण आली नाही. आपण विरोधी पक्षात असतो तेव्हा अधिक काम करता येते, असे ते म्हणाले.

नवी मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या कार्यकर्ता मेळाव्यात शरद पवार बोलत होते. पवार म्हणाले की, काहीजण चुकीच्या वाटेवर जातील, असे वाटले नव्हते. पण, तसं झालं आहे. आता त्याची चिंता करण्याचे कारण नाही. महाराष्ट्र हे स्वाभिमानी लोकांचं राज्य आहे. येथील लोक स्वाभिमानाशी तडजोड करत नाहीत. म्हणूनच ही जनता जेव्हा मतदान करेल, तेव्हा पळपुट्यांचा नक्कीच समाचार घेईल. दिल्लीश्वरांकडून अपमानास्पद वागणूक घेऊन ज्यांनी तह केला त्यांना धडा मिळेल, अशा शब्दांत पवारांनी राष्ट्रवादीची साथ सोडणाऱ्यांवर तोफ डागली.AM News Developed by Kalavati Technologies