अयोध्या राम मंदिरासाठीच्या ट्रस्टचे अध्यक्ष सरसंघचालकांनी होऊ नये - चंपतराय

सुन्नी वक्फ बोर्डाला द्यावयाची 5 एकर जमीन अयोध्या शहराच्या सीमेवर किंवा सीमेच्या बाहेर देण्यात यावी अशी मागणीही त्यांनी केली

नागपूर । अयोध्येत राम मंदिर निर्माण करण्यासाठी बनवल्या जाणाऱ्या ट्रस्टचे अध्यक्ष सरसंघचालक यांनी होऊ नये असं मत विश्व हिंदू परिषदेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष चंपतराय यांनी व्यक्त केलं आहे. नागपुरात आयोजित पत्रपरिषदेत ते बोलत होते. काही साधू संतांनी अयोध्या राम मंदिर निर्मितीसाठी बनवल्या जाणाऱ्या ट्रस्टचे अध्यक्ष राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालकांनी व्हावे अशी मागणी केली होती. त्यावर प्रश्न विचारले असता उत्तर देताना चंपतराय यांनी एक स्वयंसेवक म्हणून सरसंघचालकांनी तिथे अध्यक्ष होऊ नये असं मला वाटत असल्याचं मत व्यक्त केलं. तसेच सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाप्रमाणे सुन्नी वक्फ बोर्डाला द्यावयाची 5 एकर जमीन अयोध्या शहराच्या सीमेवर किंवा सीमेच्या बाहेर देण्यात यावी अशी मागणीही त्यांनी केली.AM News Developed by Kalavati Technologies