'तारक मेहता का उल्टा चश्मा' मालिकेतील रीटा रिपोर्टरला कोरोनाची लागण

तारक मेहता का उल्टा चश्मा या मालिकेतील रीटा रिपोर्टर अर्थात प्रिया आहूजाला कोरोनाची लागण झाली आहे

मुंबई । 'तारक मेहता का उल्टा चश्मा' या मालिकेमधील प्रिया आहूजाला कोरोनाची लागण झाली आहे. प्रियाने याबाबत स्वत: सोशल मीडियावर पोस्ट करत ही माहिती दिली आहे. प्रियाने इंस्टाग्रामवर पोस्ट करत सांगितले आहे की, 'मी कोरोनाची चाचणी केली असता त्यात माझा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. माझी तब्येत सध्या चांगली असून, डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार सध्या होम क्वारंटाईन झाले आहे. मागील 2-3 दिवसांमध्ये कोणी माझ्या संपर्कात आलं असेल तर त्यांनी आपली कोरोना चाचणी करून घ्यावी. कोरोनाला गांभीर्याने घ्या तसेच मास्कचा वापर करा' अशी पोस्ट प्रिया आहूजाने केली आहे. प्रियाच्या या पोस्ट नंतर तारक मेहता मालिकेतील कलाकारांनी प्रिया लवकरात लवकर बरी होण्याची प्रार्थना केली आहे.

दरम्यान, तारक मेहता का उल्टा चश्मा या मालिकेमध्ये प्रिया आहूजा रीटा रिपोर्टरची भुमिका करत असते. मात्र गेल्या काही दिवसांपासून ती सध्या या मालिकेमधून गायब आहे. मलिकेत काही मोठं प्रकरण जर झालं तर त्यामध्ये रीटा रिपोर्टर गोगुळ धाम सोसायटीमध्ये एन्ट्री मारत असते. रीटाची भुमिका प्रेक्षकांना मोठ्या प्रमाणात आवडते.AM News Developed by Kalavati Technologies