औरंगाबादेत कोरोनाचा वाढता आलेख, दुपारी 23 नव्या रुग्णांची वाढ, तीन जणांचा मृत्यू

जिल्ह्यात आज सकाळी 166 रुग्णांची नोंद करण्यात आली होती.

औरंगाबाद | औरंगाबादेत कोरोना व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव काही थांबण्याचं नाव घेत नाहीये. आज सकाळी जिल्ह्यात 166 रुग्णांची वाढ झाल्यानंतर दुपारी पुन्हा यामध्ये 23 रुग्णांचे (15 पुरूष, 08 महिला) अहवाल आज दुपारी पॉझिटिव्ह (सकारात्मक) आले. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 7 हजार 855 इतकी झाली आहे. त्यापैकी 4 हजार 162 रुग्ण या आजारातून बरे झाले आहेत, तर 340 जणांचा आतापर्यंत उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. सद्यस्थितीला जिल्ह्यात 3 हजार 353 जणांवर उपचार सुरु आहेत. दरम्यान नवीन आढळून आलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे (कंसात रुग्ण संख्या) :

*मनपा हद्दीतील रुग्ण : (20)*

नवजीवन कॉलनी (2), कासलीवाल परिसर (1), एन अकरा (1), रमा नगर (7), गारखेडा (2), नंदनवन कॉलनी (1), शिवाजी नगर (1), शिवाजी नगर, गारखेडा परिसर (1), सिडको (1), अन्य (3)

*ग्रामीण रुग्ण : (3)*

वाळूज (1), वंजारवाडी (1), नेहा विहार, तिसगाव, बजाज नगर (1) या भागातील कोरोनाबाधित आहेत.

*तीन कोरोनाबाधितांचा मृत्यू*

घाटीमध्ये नऊ रोजी शहरातील उस्मानपुऱ्यामधील 75, जालन्यातील 65 आणि शहरातील खासगी रुग्णालयात सिडको एन नऊमधील यशवंत सोसायटीतील 74 वर्षीय कोरोनाबाधित स्त्री रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.AM News Developed by Kalavati Technologies