जयंती विशेष - 26/11 च्या नायकाची, मेजर संदिप उन्नीकृष्णन यांची शौर्यकथा

26/11 हल्ल्यात ताज हॉटेलवरील दशतवाद्यांचा खात्मा करणाऱ्या नायकाची ही कहाणी.

स्पेशल डेस्क । 'जीना चढून वर येवू नका, दहशतवाद्यांना मी बघून घेतो.' 2008 च्या मुंबई हल्ल्यात दहशतवाद्यांशी लढताना वीरमरण पत्करलेल्या मेजर संदिप उन्नीकृष्णन यांनी त्यांच्या तुकडीला केलेली ही सूचना त्यांचे अखेरचे शब्द ठरले. हल्ल्या दरम्यान दहशतवाद्यांच्या ताब्यात असणाऱ्या 14 जणांची उन्नीकृष्णन यांनी सुटका केली. दहशतवाद्यांना सडेतोड उत्तर देत असतानाचं त्यांच्यावर पाठीमागून गोळीबार करण्यात आला. त्यांनी दहशतवाद्यांशी दिलेल्या लढ्याचे व गाजवलेल्या अपार पराक्रमाचे स्मरण सबंध देशाला आहे. 26/11 हल्ल्यात ताज हॉटेलवरील दशतवाद्यांचा खात्मा करणाऱ्या नायकाची ही कहाणी.

15 मार्च 1977ला जन्मलेल्या संदिप उन्नीकृष्णन यांनी बीए करत असतानाचं 1995 ला नॅशनल डिफेन्स अॅके़डमी (NDA)प्रवेश मिळवला. त्याग, कुतूहल व प्रखर देशसेवेच्या बळावर त्यांनी दहशतवाद्यांशी लढण्यासाठी बनवलेल्या भारतीय सेनेच्या सर्वात सक्षम, सामर्थ्यवान स्पेशल अॅक्शन फोर्सच्या (SAG) दहा जणांच्या तुकडीच्या नेतृत्त्वाची जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात आली. 26/11 हल्ल्यात दहशतवाद्यांनी ताज हॉटेल ताब्यात घेतले. अनेक विदेशी पर्यटकांसह भारतीय नागरिकांना बंदी बनवले होते.

ताज हॉटेलमधील दहशतवाद्यांचा खात्माकरून नागरिकांची सुटका करण्याची जबाबदारी मेजर उन्नीकृष्णन यांच्यावर होती. यासाठी नेमण्यात आलेल्या दहा SAG जवानांच्या तुकडीची नेतृत्त्व त्यांनी केलं. दहशतवाद्यांच्या तावडीतून ताजमधील बंदी बनवलेल्या नागरिकांपैकी 14 जणांची त्यांनी सुटका केली व इतरांची सुटका करण्याच्या प्रयत्नात असतानाच त्यांच्यावर पाठीमागून हल्ला झाला व यात त्यांना वीरमरण आलं.

26 जानेवारी 2009 ला मेजर उन्नीकृष्णन यांना मरणोत्तर आशोक चक्र देवू त्यांचा गौरव करण्यात आला. मुंबई दहशतवादी हल्ल्यास 11 वर्ष उलटली पण मेजर उन्नीकृष्णन यांचा पराक्रम सदैव, चिरतंर भारतीयांच्या स्मरणात राहिल.AM News Developed by Kalavati Technologies