जळगाव जिल्ह्यात कोरोनाचा रेकॉर्ड ब्रेक..;एकाच दिवसात आढळले 487 कोरोनाबाधित रुग्ण

जिल्हयात आतापर्यंतची सर्वाधिक रुग्णांची विक्रमी वाढ, रुग्णसंख्या पोहोचली 13,574 वर

जळगाव । जळगाव जिल्ह्यात आज कोरोनाचे रेकॉर्डब्रेक झाले असून आज पुन्हा, 487 कोरोनाबाधित रूग्ण आढळले आहे. त्यामुळे एकूण रुग्णसंख्या 13 हजार 574 झाली आहे. सर्वाधिक 99 कोरोबाधित रुग्ण हे जळगाव शहरात आढळून आले आहेत. दिवसभरात 8 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दुसरीकडे शुक्रवारी दिवसभरात 199 जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. जिल्हयात दिवसेंदिवस कोरोनाचा कहर सुरुच आहे. शुक्रवारी जिल्ह्यात कोरोनाचे व्रिकमी रुग्ण आढळून आले.

शुक्रवारी नव्याने 487 कोरोनाबाधीत रुग्णांची भर पडली आहे. आज नव्याने आढळलेल्या रूग्णांमध्ये जळगाव शहरातील 99, जळगाव ग्रामीण 31, भुसावळ 23, अमळनेर 32, चोपडा 45, पाचोरा 8, भडगाव 43, धरणगाव 17, यावल 9, एरंडोल 79, जामनेर 28, रावेर 6, पारोळा 34, चाळीसगाव 26, बोदवड 4 इतर जिल्ह्यातील 3 रुग्णांचा समावेश आहे.

दिवसभरात 8 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यात जळगाव शहर, अमळनेर, चोपडा, पाचोरा, यावल, रावेर, पारोळा व चाळीसगाव तालुक्यातील प्रत्येकी एकाचा समावेश आहे. अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तथा जिल्हा रुग्णालयाचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.नागोराव चव्हाण यांनी दिली आहे.AM News Developed by Kalavati Technologies