देशात पहिल्यांदाच मंदी; मोदींनी देश कमकुवत केला, राहुल गांधींचा मोदी सरकारवर हल्लाबोल

देशात पहिल्यांदा सर्वात मोठी आर्थिक मंदी आली असून, मोदींनी देशाची ताकत कमकुवत केली असल्याचं राहुल गांधी म्हणाले

नवी दिल्ली । 2020-21 च्या दुसऱ्या तिमाहीत देशाची अर्थव्यवस्था मोठ्या प्रमाणात घसरली असून, भारतात ऐतिहासिक मंदी आल्याचं रिजर्व बॅंक ऑफ इंडियाने सांगितल्या नंतर, काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी देशाच्या अर्थव्यवस्थेवरून पंतप्रधान मोदी सरकारवर हल्लाबोल केला. तसेच मोदी सरकारने केलेल्या नोटबंदीवर त्यांना भाष्य केले. देशाच्या ताकतीला आपल्या पंतप्रधानांनी कमकुवत केल्याचेही राहुल म्हणाले.

राहुल यांनी ट्विट करत सांगितले आहे की, 'देशाच्या आतापर्यंतच्या इतिहासात पहिल्यांदा मोदी सरकारच्या काळात आर्थिक मंदी असून, पंतप्रधान मोदींनी देशाच्या ताकतीला कमकुवत केलं आहे. रिजर्व बॅकेने दिलेल्या आकड्यानुसार, 2020-21 च्या दुसऱ्या तिमाही म्हणजे जुलै-सप्टेंबर या कालावधीत देशाचा अर्थव्यवस्था दर मोठ्या प्रमाणात खालावला आहे. देशाचा जीडीपी दर दुसऱ्या तिमाहीत -8.6% वर आला.' असे ट्विट राहुल गांधी यांनी केले आहे.

गेल्या काही दिवसांपासून राहुल गांधी नोटबंदी, लॉकडाऊन आणि सरकारच्या इतर योजनाचा भांडाफोड करीत आहे. यंदा नोटबंदीला चार वर्ष झाली असून, नोटबंदीचा निर्णय गरिबांवर अन्याय आणि श्रीमंतांसाठी फायदाचा असून, याच कालावधीत मोठमोठ्या लोकांनी आपला काळा पैसा गोरा केला. असेही राहुल म्हणाले होते. तसेच देशात अचानक लॉकडाऊन करण्याचा निर्णय हा चुकीचा असून, यामुळे अनेक कामगाराचे, गरिबांचे हाल झाल्याचे राहुल म्हणाले.AM News Developed by Kalavati Technologies