घरगुती गॅस सिलेंडर झाला स्वस्त, लॉकडाऊनमध्ये ग्राहकांना दिलासा

घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात कपात करण्यात आली आहे

मुंबई | कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर देशात सध्या लॉकडाऊन करण्यात आले आहेत. या लॉकडाऊनमध्ये सर्वसामान्यांना अनेक समस्यांना तोड द्यावे लागत आहे. मात्र असे असतांना देखील एक दिलासा देणारी बातमी आहे. घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात कपात करण्यात आली आहे. एलपीजी गॅस सिलेंडर 60 रुपयांनी स्वस्त झाला आहे. इंडियन ऑईल कॉर्पोरेशने ही घोषणा केली आहे. त्यामुळे लॉकडाऊनच्या काळात सर्वसामान्यांना थोडा दिलासा मिळाला आहे. इंडियन ऑईल कॉर्पोरेशनच्या घोषणेनुसार मुंबईत गॅस सिलेंडर 62 रुपयांनी स्वस्त असून गॅसची नवीन किंमत 714.50 झाली आहे. तर दिल्लीसुद्धा गॅस 61.50 रुपयांनी स्वस्त झाला असून नवीन किंमत 744 झाली आहे.AM News Developed by Kalavati Technologies