पीएमसी बॅंकेबाबत रिझर्व्ह बॅंक घेणार 30 ऑक्टोबरला निर्णय

पीएमसी खातेधारक गेल्या काही दिवसांपासून आझाद मैदानात आंदोलन करत आहेत.

मुंबई । कित्येक खातेदारांचा जीव टांगणीला लावलेल्या PMC बँके बाबतचा निर्णय रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया येत्या 30 ऑक्टोबरला जाहीर करण्याची शक्यता आहे. RBI ने आझाद मैदानात आंदोलन करणा-या पीएमसी खातेधारकांच्या शिष्टमंडळाची भेट घेतली. यावेळी त्यांनी आपण 30 ऑक्टोबरला निर्णय जाहीर करण्याचे आश्वासन दिले आहे.

पीएमसी खातेधारक गेल्या काही दिवसांपासून आझाद मैदानात आंदोलन करत आहेत. आज पीएमसी खातेदारकांची आरबीआयच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक निष्पन्न झाली. यावेळी आरबीआयने सध्या आचारसंहिता लागू असल्याने निर्णय घेणं शक्य नसल्याचं सांगितलं असल्याची माहिती एका खातेधारकाने दिली आहे. तसंच आरबीआयने 25 आणि 27 ऑक्टोबरला पुन्हा एकदा बैठक घेतली जाईल असं सांगितलं आहे. यावेळी आरबीआयने 30 ऑक्टोबर रोजी पत्रकार परिषद घेत निर्णय जाहीर करु असंही आश्वासन दिलं

दरम्यान पीएमसी बँक घोटाळाप्रकणी अटकेत असणाऱ्या आरोपी राकेश वाधवन आणि सारंग वाधवन यांच्या कोठडीत 24 ऑक्टोबरपर्यंत वाढ करण्यात आली आहे. पीएमसी बॅंकेमध्ये 4355 कोटीच्या घोटाळ्यांच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. थॉमस यांना 4 ऑक्टोबर दिवशी मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्यावर हाऊसिंग डेव्हलपमेंट इंफ्रास्ट्रक्चर लिमिटेडला दिलेलं कर्ज RBI पासून लपवण्यात आल्याचे आरोप लावण्यात आले आहेत.

त्याचबरोबर पीएमसीच्या घोटाळ्यामुळे रविवार (20 ऑक्टोबर) च्या रात्री 73 वर्षीय भारती सरदंगानी  या वृद्ध महिलेचा हार्ट अटॅकच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाल्याची बाब समोर आली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, भारती यांच्या मुलीचं आणि जावयाचं बॅंक अकाऊंट पीएमसी बॅंकेमध्ये होते. त्यांच्या कुटुंबाच्या भविष्याच्या टेन्शनमुळे तणावाखाली असलेल्या भारती यांचा रविवारी रात्री मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले.AM News Developed by Kalavati Technologies