Breaking..! रेपो रेट, रिव्हर्स रेपो रेट 'जैसे थे'; ईएमआयवर सवलत कायम..

रेपो दर 4 टक्के तर, रिव्हर्स रेपो दर 3.3 टक्के कायम ठेवण्याची माहिती गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी दिली

नवी दिल्ली । कोरोना आणि लॉकडाऊनच्या काळात भारतीय अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसला होता. मात्र आता हळूहळू अर्थव्यवस्था पूर्वपदावर येत असल्याचे आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी माहिती दिली आहे. एप्रिलच्या तुलनेत आता अर्थव्यवस्था बऱ्यापैकी सुधारायला सुरुवात झाली; असल्याचे दास यांनी सांगितले आहे. याशिवाय ईएमआय, रेपो दरातील बदल आणि अनेक निर्णयांबाबत त्यांनी घोषणा केली आहे.

लॉकडाऊन आणि कोरोनामुळे रिझर्व्ह बँकेने ईएमआयवरील व्याज दरात 2 वेळा 1.5 टक्क्यांनी कपात केली आहे. याशिवाय रेपो दर 4 टक्के तर रिव्हर्स रेपो दर 3.3 टक्के कायम ठेवण्याची माहिती गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी दिली आहे.AM News Developed by Kalavati Technologies