रायगड | मतिमंद मुलीवर लैंगिक अत्याचार, सात जण अटकेत

रेवदंडा परिसरातील घटना, आरोपींना 8 एप्रिल पर्यत पोलीस कोठडी

रायगड | मतिमंद मुलीवर सात जणांनी वारंवार लैंगिक अत्याचार केला. यानंतर ती गरोदर राहिल्याची धक्कादायक घटना अलिबाग तालुक्यातील रेवदंडा येथे घडली आहे. या प्रकरणी रेवदंडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. सातही जणांना पोलिसांनी अटक केली असून सातही जणांना अलिबाग न्यायालयात दाखल केले असून 8 एप्रिल पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या घटनेमुळे तालुक्यात खळबळ माजली आहे. 

अलिबाग तालुक्यातील रेवदंडा गावात पीडित मुलगी आपल्या आई वडिलांसोबत राहते. ही मुलगी मतिमंद आहे. तिच्या परिसरात राहणाऱ्या सात जणांनी या मुलीच्या मतिमंद पणाचा फायदा घेऊन सात महिने वारंवार आळीपाळीने लैंगिक अत्याचार केला. त्यानंतर मुलीची तब्येत बिघडून त्रास जाणवू लागला. यासाठी पीडित मुलीच्या घरच्यांनी त्यांना डॉक्टरकडे नेले.

डॉक्टरांनी तपासले असता पीडित मुलगी ही गर्भवती असल्याचे डॉक्टरांनी पालकांना सांगितले. त्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. यामध्ये परिसरातील सात जणांनी पीडित मुलीवर अत्याचार केल्याचे समोर आले आहे. रेवदंडा पोलीसांनी सात जणांना त्वरित अटक केली आहे. त्यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. आज न्यायालयात हजर केले असता 8 एप्रिल पर्यत पोलीस कोठडी सुनावली आहे. या गुन्ह्याचा तपास डीवायएसपी सोनाली कदम करीत आहेत.AM News Developed by Kalavati Technologies