यवतमाळच्या रँचो शेतकऱ्याने टाकाऊ वस्तूंपासून तयार केले फवारणी यंत्र

यंत्राद्वारे सुमारे पाच तास फवारणी केली जाऊ शकते

राळेगाव यवतमाळ । गरज ही शोधाची जननी असते असं म्हटलं जात. एकीकडे शेतकऱ्याच्या पिकाला भाव मिळत नाही, आणि दुसरीकडे उत्पादन खर्च वाढतो आहे. हा उत्पादनखर्च कमी करण्याच्या दृष्टीने शेतकरी सतत प्रयत्नशील असतात. असाच काहीसा प्रत्यय यवतमाळ जिल्ह्यातील राळेगाव तालुक्यातील रिधोरा येथे समोर आला आहे. या रँचो शेतकऱ्याने शेतातील टाकाऊ वस्तूंपासून फवारणी यंत्र बनविले. या यंत्राची पंचक्रोशीत चर्चा होत आहे.

हरीश काळे असे या जुगाडू शेतकऱ्याचे नाव आहे. यांनी आपल्या शेतामध्ये फवारणीसाठी टाकाऊ वस्तू पासून फवारणी यंत्र बनविले. या यंत्रासाठी त्यांनी आपल्याच शेतातील लोखंडी पाईप, प्लास्टिक पाईप, नोझल्स, एक चाक आणि रीचार्जे होणारी बॅटरी याचा वापर केला आहे. अत्यल्प खर्चात त्याने घरच्याघरी हे फवारणी यंत्र बनविले आहे. या यंत्राद्वारे सुमारे पाच तास फवारणी केली जाऊ शकते. या फवारणी पंपाद्वारे तणनाशक, कीटकनाशक, प्रवाहित खते आणि झाडाला लागणारे टॉनिक सुद्धा फवारल्या जाऊ शकते. शिवाय कमीकष्टात एका तासात सुमारे एक एकर शेत फवारून होते. त्याशिवाय मजुरीचीही बचत होते. मशीनमध्ये पाणी टाकून प्रात्यक्षीक करून दाखवले. हरीश यांनी आपल्या शेतात असे बरेचशी उपक्रम राबविली आहे. त्यांच्या या फवारणीची आजूबाजूच्या खेड्यात मोठ्या प्रमाणावर चर्चा सुरु आहे.AM News Developed by Kalavati Technologies