Ram Mandir Bhumi Pujan : राम मंदिर पायाभरणी सोहळा संपन्न..

Ram Mandir Ceremony Updates : ऐतिहासिक राम मंदिराच्या भूमिपूजनासाठी अयोध्या नगरी सजली आहे. पंतप्रधान मोदींच्या हस्ते हे भूमिपूजन झाले आहे. अयोध्येनगरीपासून ते राम मंदिराच्या भूमिपूजनापर्यंत जाणून घ्या अपडेट्स फक्त AM NEWS वर

 • 02:15 IST इराण आणि चीनमध्येही रामकथांचं विवरण मिळेल. नेपाळचा तर माता जानकीशी संबंध जोडला गेला आहे. अशा अनेक देशांमध्ये राम आजही आहे - मोदी 
 • 02:08 IST भगवान गौतम बुद्धही रामाशी जोडले आहेत. भारताच्या विविधतेत एकतेच प्रतीक म्हणून अयोध्या असेल- मोदी
 • 02:07 IST मावळे छत्रपतींच्या स्वराज्य स्थापनेसाठी निमित्त झाले, त्याप्रमाणे इथेही आज देशभरातल्या लोकांच्या सहयोगाने राममंदिर निर्मितीचं हे पुण्यकर्म सुरू झाले आहे- मोदी
 • 01:57 IST संपूर्ण जगातून इथे लोक येतील. कितीतरी गोष्टी यातून बदलतील - मोदी
 • 01:55 IST  'हे मंदिर उभं राहिल्यानंतर अयोध्येची भव्यता वाढेल. पण त्याबरोबर इथली सगळी अर्थव्यवस्थाही बदलेल- मोदी
 • 01:13 IST राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवतांच देशाला संबोधन
 • 01:02 IST राम मंदिर सोहळा संपन्न.. थोड्याच वेळात पंतप्रधान देशाला संबोधीत करणार
 • 12:51 IST राम मंदिर भूमीपूजन सोहळा संपन्न..
 • 12:41 IST कोरोनाच्या काळात पूजा करण्यासाठी सर्वजण मास्क आणि सोशल डिस्टंसिगचा पालन करत आहेत
 • 12:25 IST राममंदिर भूमीपूजन करतानाची खास दृश्ये..
 • 12:20 IST राममंदिर भूमीपूजन सोहळ्याला सुरूवात
 • 12:03 IST पंतप्रधान नरेंद्र मोदींनी हनुमानाचं घेतलं दर्शन...मंदिराचे मुख्य पुजारी श्री गद्दीनशीन प्रेमदास महाराज यांनी मोदींना चांदीचा 'मुकुट' परिधान केला.
 
 • 11: 40 IST पंतप्रधान नरेंद्र मोदी राम जन्मभूमीत दाखल, थोड्याच वेळात सुरू होणार भूमिपूजनाचा कार्यक्रम
 • 11:30 IST पंंतप्रधान नरेंद्र मोदी अयोध्येत दाखल...
 • 11:20 IST राष्ट्रीय स्वयंसेवक संघ प्रमुख मोहन भागवत भूमीपूजनाला पोहोचले
 • 11:10 IST राम जन्मभूमीतील राममंदिराचा फोटो

 • 11:08 IST राष्ट्रीय स्वयंसेवक संघ प्रमुख मोहन भागवत भूमीपूजनाला पोहोचले; थोड्याच वेळात पंतप्रधानही पोहोचणार 

 • 11:02 IST भूमीपूजन सोहळ्याआधी रामदेव बाबांची पहिली प्रतिक्रिया

 • 10:37 IST पंतप्रधान नरेंद्र मोदी लखनऊला पोहोचले; येथून होतील अयोध्येला रवाना
 • 10:20 IST  मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ अयोध्येत पोहोचले

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे अयोध्येत आगमन झाले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदीही थोड्याच वेळात अयोध्येत दाखल होणार आहे. अयोध्येत पूजाला प्रारंभ झाला आहे, सकाळीच रामलल्लाचे दर्शनही झाले आहे. राज्यपाल आनंदी बेन पटेल, उमा भारती आणि इतर बरेच पाहुणे अयोध्येत भूमिपूजन स्थळी पोहोचले आहेत.

 • 09:50 IST  याच जागेवर होणार राममंदिराचं भूमीपूजन 

याच जागेवर होणार राममंदिराचं भूमीपूजन

 • 09:38 IST भूमिपूजन सोहळ्या आधी  रामलल्लाचं दर्शन

 • 09:33 IST  पंतप्रधान नरेंद्र मोदी अयोध्येसाठी रवाना

 • 08:41 IST हनुमानगढ़ी मंदिराचे मुख्य पुजारी प्रेमदासजी महाराज म्हणतात की, पंतप्रधानांचा अयोध्या दौरा हा ऐतिहासिक क्षण आहे, आम्ही त्यांचा सन्मान करणार आहोत. पंतप्रधानांना यावेळी चांदीचा मुकुट, गालिचा सुद्धा दिला जाणार आहे.


AM News Developed by Kalavati Technologies