अगस्ती कारखान्याने शेतकऱ्यांना प्रतिटन 200 रुपये उचल द्यावी, आमदार डॉ.किरण लहामटे यांची मागणी

कोरोनाच्या संकटात शेतकऱ्यांना मदत करण्याचे आमदार लहामटे यांचे आवाहन

अहमदनगर । कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे शेतकरी संकटात सापडला आहे. प्रचंड खर्च करूनही कोणत्याही पिकाला बाजारभाव मिळत नाही. अशा या बिकट परिस्थितीत अकोले तालुक्याची कामधेनू समजल्या जाणाऱ्या अगस्ती कारखान्याने शेतकऱ्यांची सध्याची परिस्थिती सावरण्यासाठी प्रतिटन 200 रुपये शेतकऱ्यांना उचल द्यावी, या मागणीचे निवेदन आज आमदार ड़ॅा.किरण लहामटे यांच्या मार्गदर्शनाखाली अगस्ती कारखान्याचे एम डी घुले यांना देण्यात आले.

ज्या उसाच्या जातीची रिकव्हरी जास्त त्या जातीस लागवडीसाठी प्रोत्साहन द्यावे व त्यासाठी संचालक मंडळाने सन 2020-21 मध्ये अशा प्रकारच्या जातीची लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांना 100 रूपये टन जास्त भाव द्यावा अशी मागणी केली आहे. आमदार डॉ.किरण लहामटे यांच्या समवेत राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष भानुदास तिकांडे, संदीप शेणकर, अमित नाईकवाडी उपस्थित होते. अगस्ती कारखान्याचे संचालक मंडळ आमच्या गांभीर्याने विचार करतील असा आत्मविश्वास आमदार डॉ.किरण लहामटे यांनी व्यक्त केला.



AM News Developed by Kalavati Technologies

A PHP Error was encountered

Severity: Core Warning

Message: PHP Startup: Unable to load dynamic library 'ftp.so' (tried: /RunCloud/Packages/php72rc/lib/php/extensions/no-debug-non-zts-20170718/ftp.so (/RunCloud/Packages/php72rc/lib/php/extensions/no-debug-non-zts-20170718/ftp.so: cannot open shared object file: No such file or directory), /RunCloud/Packages/php72rc/lib/php/extensions/no-debug-non-zts-20170718/ftp.so.so (/RunCloud/Packages/php72rc/lib/php/extensions/no-debug-non-zts-20170718/ftp.so.so: cannot open shared object file: No such file or directory))

Filename: Unknown

Line Number: 0

Backtrace: