डोंबिवली रेल्वे स्थानकात ट्रकला अपघात, रेल्वेचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर, प्रवाशांध्ये घबराट

क्रेनच्या सहाय्य्यने सदरचा ट्रक बाहेर काढण्यात आला.

डोंबिवली । रेल्वे स्थानकात आज दुपारी एक ट्रक खड्डयात जाऊन पलटी होता होता राहिला. या प्रकारामुळे फलाट क्रमांक एक वरून प्रवास करणाऱ्या प्रवाश्यांमध्ये मोठी खळबळ उडाली होती. डोंबिवली फलाट क्र. 1 चे काम सध्या जोरात सुरु असून त्यासाठी रेती सिमेंट आणणाऱ्या ट्रक्सची मोठ्या प्रमाणात ये-जा सुरु आहे. कोणतीही सुरक्षा यंत्रणा नसल्याने दुपारी दीडच्या सुमारास बांधकामाची खडी घेऊन आलेल्या ट्रकचे मागील चाक खड्डयात गेले व संपूर्ण ट्रक तिथे अडकून पडला. सदर ठिकाणी मोठा नाला असून त्यावर स्लॅब टाकून रस्ता बनवला जात असता हा स्लॅब तुटून सदरचा अपघात झाल्याची माहिती ट्रक चालकाने दिली. रेल्वेचे हे काम प्रवाश्यांच्या जीवावर देखील बेतू शकते त्यामुळे सर्व प्रवासी जीव मुठीत घेऊन येजा करत आहेत. बऱ्याच वेळाने अग्निशमन दल, RPF, GRP चे जवान घटनास्थळी पोहोचले व क्रेनच्या सहाय्य्यने सदरचा ट्रक बाहेर काढण्यात आला.AM News Developed by Kalavati Technologies