रायगड । नवऱ्याच्या प्रेयसीची केली हत्या, 18 तासात दोन आरोपींना अटक

नेहमीच होणाऱ्या भांडणाला कारणीभूत ठरणाऱ्या पतीच्या प्रेयसीचा काटा काढण्याचे पहिल्या पत्ननीने ठरवले

रायगड । नवऱ्याच्या प्रेयसीचा खून करणाऱ्या दोन महिलांना अटक करण्यात आली आहे. पतीचे दुसऱ्या महिले बरोबर असलेल्या अनैतिक सबंधातून पत्नी व मुलीच्या मित्राच्या संगनमताने पतीच्या प्रेयसीचा खून करून तो चिरनेर परिसरात टाकून दिला होता. उरण पोलिसांनी शिताफीने तपास करत १८ तासांच्या आत खुनाचा उलगडा करत दोन आरोपींना अटक करण्यात यश मिळवले आहे.

उरण तालुक्यातील चिरनेर येथील बापूजीदेव परिसरात २५ ते ३० निर्घृणपणे वार केलेल्या एका महिलेचा मृतदेह सोमवार सापडला होता. आरोपींनी कोणतेही धागेदोरे सोडले नसल्याने पोलिसांना आव्हान होते. याबाबत उरण पोलीस ठाण्यात अज्ञात इसमा विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यातील महिला आरोपीचा पती यांनी मयत महिला कल्पना उर्फ जया तुकाराम घाणेकर हिच्याबरोबर प्रेमसबंधातून विवाह केला होता. यामुळे कल्पना हिचा प्रियकर व त्याची पहिली पत्नी यांच्यात अनेकवेळा वादावाद झाले होते. नेहमीच होणाऱ्या भांडणाला कारणीभूत ठरणाऱ्या पतीच्या प्रेयसीचा काटा काढण्याचे पहिल्या पत्ननीने ठरविले.

प्रियकराची पहिली पत्नी तबस्सुम मुख्तार अली संग्राम, मुलगी रुकसार व मुलीचा मित्र यांनी संगनमत करून मयत कल्पना उर्फ जया घाणेकरला मानसरोवर येथून उचलून चिरनेर येथील निर्जनस्थळी आणून तीक्ष्ण हत्याराने निर्घृणपणे २५ ते ३० वार करुन खून केला. त्यानंतर तिचा मृतदेह ओळखू नये म्हणून चिरनेर परिसरातील कचऱ्याच्या ढिगाऱ्यात फेकून देऊन पसार झाले होते. गुप्त माहितीच्या आधारे मयत महिला कल्पना उर्फ जया घाणेकर हिची ओळख पटवून शहाबाजगाव बेलापूर परिसरात राहणारी आई व मुलगी यांना ताब्यात घेऊन पोलीसी खाक्या दाखवल्यानंतर त्या दोघींनी एका इसमाच्या साथीने गुन्हा केला असल्याची कबुली दिली. त्यानंतर या गुन्ह्याप्रकरणी त्यांना अटक करण्यात आली. त्यांना न्यायालयात उभे केले असता सात दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे.AM News Developed by Kalavati Technologies