रायगड | एकाच कुटुंबातील तीन जणांची कोरोनावर मात, रुग्णालयातून मिळाला डिस्चार्ज

जिल्ह्यात कोरोना बाधितांचा आकडा साडेआठशेच्या वर गेला असला तरी बरे होण्याचे प्रमाण 57.3 टक्के इतके झाले आहे.

रायगड | जिल्ह्यात कोरोना बाधितांचा आकडा साडेआठशेच्या वर गेला असला तरी बरे होण्याचे प्रमाण 57.3 टक्के इतके झाले आहे. ही समाधानाची बाब आहे त्यामुळे ग्रामीण भागात कोरोनाबाबतची भीती कमी होत चालली आहे. काही दिवसांपुर्वी अलिबाग तालुक्यातील रामराज येथील एकाच कुटुंबातील तिघांना कोरोनाची लागण झाली होती. उपचारासाठी त्यांना अलिबागच्या जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. दरम्यान एकाच कुटुंबातील असलेल्या या तीन जणांनी कोरोनावर मात केली असून त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. कोरोनावर यशस्वी मात केल्यानं ग्रामस्थांनी तिघांचेही पुष्पवृष्टी करून आणि टाळ्या वाजवून स्वागत केले आहे.AM News Developed by Kalavati Technologies