रायगड | खालापूर तालुक्यात कोरोनाचा आणखी एक बळी, 50 वर्षीय महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू

खालापूर तालुक्यातील वानिवली गावातील पन्नास वर्षीय महिलेचा कोरोनाने मृत्यू झाला आहे.

रायगड | खालापूर तालुक्यात कोरोनाने शिरकाव केल्यानं कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. आषाढी एकादशीला तालुक्यात 15 कोरोनाबाधित रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. अशातच तालुक्यातील वानिवली गावातील पन्नास वर्षीय महिलेचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. तसेच मृत महिलेच्या कुटुंबातील पंधरापेक्षा जास्त जण कोरोना संशयित असल्याची माहिती आहे. याअगोदर तालुक्यातील चार कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. तर 19 रुग्ण कोरोनावर मात करून बरे झाले आहेत. सद्यस्थितीला तालुक्यात 72 जणांवर उपचार सुरू आहेत.

खालापूर तालुक्यात 1 जुलैपर्यंत 95 कोरोनाबाधित रुग्ण सापडले आहेत. यात वासांबे मोहोपाडा आणि खोपोली परीसरातील कोरोनाबाधित रुग्णसंख्या लक्षणीय आहे. तरी नागरिकांनी आपल्या स्वता:ची कालजी घ्यावी,सोशल डिस्टेंसिंगचे पालन करावे असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.AM News Developed by Kalavati Technologies