आयसीसी क्रमवारीत राहुलची मोठी झेप, कोहली-रोहित टॉप टेनमध्ये

न्यूझीलंडविरुद्धच्या 5 सामन्यांच्या टी -20 आंतरराष्ट्रीय मालिकेत केएल राहुलने 2 अर्धशतकांसह 224 धावा केल्या आहेत

स्पोर्ट्स डेस्क ।  सोमवारी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (आयसीसी) ने टी -20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटची ताजी रँकिंग जाहीर केली आहे. आयसीसीच्या ताज्या टी -20 रँकिंगमध्ये भारतीय संघाचा टॉप ऑर्डर फलंदाज केएल राहुलने मोठी झओप घेतली आहे.

केएल राहुलने टी -20 आंतरराष्ट्रीय क्रमवारीत आपले सर्वोत्तम स्थान गाठले. आयसीसीच्या ताज्या क्रमवारीत प्रथम क्रमांकाचा फलंदाज म्हणजे पाकिस्तानचा बाबर आझम, तर के.एल. राहुलने विराट कोहली आणि रोहित शर्मासारख्या दिग्गज फलंदाजांना मागे टाकले आहे.

भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली आयसीसी टी -20 क्रमवारीत 9 क्रमांकावर आहे, तर उपकर्णधार रोहित शर्माने प्रथम दहामध्ये स्थान मिळवले आहे. दुसरीकडे विकेटकीपर फलंदाज केएल राहुल सहाव्या स्थानावरून दुसर्‍या स्थानावर आला आहे. त्याला त्याच्या मेहनतीचे फळ मिळाल्याचे यातुन स्पष्ट दिसत आहे.

न्यूझीलंडविरुद्धच्या 5 सामन्यांच्या टी -20 आंतरराष्ट्रीय मालिकेत केएल राहुलने 2 अर्धशतकांसह 224 धावा केल्या आहेत. द्विपक्षीय मालिकेत भारतीय फलंदाजाने सर्वाधिक वैयक्तीक धावा केल्या आहेत. या कामगिरीमुळे केएल राहुलने आयसीसी टी -20 आय क्रमवारीत प्रथमच अव्वल 3 मध्ये स्थान मिळवले आहे.AM News Developed by Kalavati Technologies