देशाची अर्थव्यवस्था तळागळात गेली तरीसुद्धा म्हणातेय कि, 'सब चंगा सी' - राहुल गांधी

अर्थव्यवस्थेत आलेल्या ऐतिहासिक घसरण तसेच रोजगाराच्या मुद्द्यांवरून राहुल यांनी मोदी सरकारवर टिका केली आहे

नवी दिल्ली । काँग्रेसचे पुर्व अध्यक्ष राहुल गांधींनी पुन्हा एकदा मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे. देशात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव, अर्थव्यवस्थेत आलेली घसरण आणि रोजगाराच्या मुद्द्यांवरून राहुल यांनी केंद्र सरकारवर टिका केली आहे. "कोरोना विरुद्धच्या लढ्यात मोदी सरकारच्या विविध धोरणांमुळे भारताची अर्थव्यवस्था तळागळात पोहोचली आहे. तसेच जीडीपीत आत्तापर्यंतची सर्वाधिक घसरण पाहायला मिळाली आहे" असे राहुल म्हणाले.

"देशात सुमारे 12 कोटी तरुणांना आपल्या नोकऱ्या गमवाव्या लागल्या. तसेच कोरोनाचा जर विचार केला तर रोजच कोरोनाचा विक्रमी रेकॉर्ड होत आहे. कोरोना महामारीला रोखण्यासाठी मोदी सरकार अपयशी ठरलं आहे. मात्र भारत सरकार आणि मीडियासाठी सर्वकाही चांगलं आहे" असे राहुल गांधीनी सांगितले आहे.
दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून राहुल गांधींनी भाजपच्या पोलखोलीसाठी ट्विटरवर व्हिडिओ मालिका सुरू केली आहे. त्यात राहुल वेगवेगळ्या मुद्द्यावर मोदी सरकारच्या योजनांची पोलखोल करण्याचा प्रयत्न करीत आहे.AM News Developed by Kalavati Technologies