राहुल गांधी यांचं वक्तव्य म्हणजे परिस्थितीचं खापर शिवसेनेवर फोडून नामानिराळे राहण्याचा प्रयत्न - देवेंद्र फडणवीस

हे सरकार पाडण्यात भाजपाला रस नाही, देवेंद्र फडणवीस यांची स्पष्ट भूमिका

मुंबई | राज्यातील कोरोना आणि राजकीय परिस्थितीवर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेऊन भूमिका मांडली. कोरोनामुळे राज्यात निर्माण झालेल्या परिस्थितीविषयी चिंता व्यक्त करतानाच हे सरकार पाडण्यात भाजपाला रस नाही, अशी स्पष्ट भूमिका देवेंद्र फडणवीस यांनी मांडली. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी केंद्र सरकारकडून मिळालेल्या मदतीची यादीच वाचून दाखवली. देवेंद्र फडणवीस यांनी आज ऑनलाइन पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी ही टीका केली. महाराष्ट्रात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. राज्यातील परिस्थिती हाताबाहेर जात आहे. हे खरं आहे. पण म्हणून काँग्रेसला जबाबदारी झटकता येणार नाही. राहुल गांधी यांचं वक्तव्य म्हणजे परिस्थितीचं खापर शिवसेनेवर फोडून नामानिराळे राहण्याचा प्रयत्न आहे. तुम्ही ठाकरे सरकारला बाहेरून पाठिंबा दिलेला नाही. तुम्ही सरकारमध्ये सहभागी आहात. त्यामुळे तुम्हाला जबाबदारी झटकता येणार नाही, असं सांगतानाच राहुल यांचं वक्तव्य जबाबादारी झटकणारं आहे. त्यांचं हे विधान ऐकून मलाही आश्चर्याचा धक्का बसला, असं फडणवीस म्हणाले. राज्यातील परिस्थिती हाताबाहेर जात असल्याने सरकारमधील घटक पक्ष साथ सोडून जात असल्याचा टोलाही त्यांनी लगावला.

फडणवीस म्हणाले, 'केंद्राकडून देण्यात येणाऱ्या आर्थिक मदतीचा खर्च राज्य सरकार अद्याप करू शकलेला नाही. राज्य सरकारचे प्राधान्य काय आहे हे मला समजत नाही, आज राज्याला सकारात्मक नेतृत्वाची गरज आहे. मला आशा आहे की उद्धव ठाकरे योग्य निर्णय घेतील. ते म्हणाले की कोविड -19 ची गंभीर परिस्थिती पाहता आपल्या राज्यातील सरकार बदलण्यात काही रस नाही. आम्ही कोरोना विषाणूविरूद्ध लढत आहोत आणि त्यासाठी राज्य सरकारवर दबाव आणू इच्छित आहोत.AM News Developed by Kalavati Technologies