बिहार विधानसभेच्या प्रचारासाठी राहुल गांधी उतरले मैदानात, कृषी विधेयकावरून मोदी सरकारवर केला हल्लाबोल

बिहार विधानसभा निवडणुकीच्या प्रचारसाठी राहुल गांधी प्रचारासाठी बिहारात असून, त्यांनी मोदी सरकारच्या कृषी विधेयकावरून मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे

नवी दिल्ली । बिहार विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी प्रचारासाठी उतरले आहे. राहुल गांधींनी आज नवादातील हिसुआ या ठिकाणी राजद नेता तेजस्वींसोबत एका प्रचार सभेला हजेरी लावली. यावेळी राहुल गांधींनी केंद्र सरकारवर मोठ्या प्रमाणात हल्लाबोल केला. केंद्र सरकारने राज्यसभेत बहुमताच्या जोरावर कृषी विधेयके मंजूर केली. त्यावर राहुल यांनी आपले भाष्य केले. राहुल म्हणाले की, 'ते येतात आणि सांगतात की शेतकऱ्यांसमोर मी नतमस्तक होतो. तसेच भारतीय सेनेसमोर सुद्धा ते हेच उदाहरण देतात. मात्र मोदी हे व्यावसायिकांसाठी काम करतात' असा टोल राहुल यांनी मोदींना लगावला.

पुढे नोटबंदीवर भाष्य करतांना राहुल म्हणाले की, 'नोटबंदीमुळे जनतेचे मोठ्या प्रमाणात हाल झाले मोदींनी अचानक नोटबंदी केल्यामुळे नागरिकांनी बॅंकेसमोर कित्येक तास उभे राहावे लागले. तसेच काँग्रेसची सत्ता असतांना आमच्या सरकारने 70 हजार कोटी रुपयांची कर्जमाफी केली होती. त्याचा सर्वात जास्त फायदा मध्य प्रदेश, छत्तीसगढ़ आणि पंजाबच्या शेतकऱ्यांना मिळाला होता.' बिहारची जनता आता खरं काय आणि खोटं काय हे चांगल्या पद्धतीने ओळखते. त्यामुळेच आता बिहारची जनता नरेंद्र मोदी आणि नितीश कुमार यांना पळवून लावणार आहे. असे राहुल गांधी म्हणाले.AM News Developed by Kalavati Technologies