राफेलची पूजा ही आपली परंपरा, खर्गे नास्तिक माणूस, त्यांना हा तमाशा वाटतो - संजय निरूपम

एक टक्के लोकांचा विचार कॉंग्रसचा विचार होऊ शकत नाही असं ते म्हणाले.

मुंबई । फ्रान्समधील राफेल विमानाच्या शस्त्र पूजेवरून कॉंग्रेस नेते संजय निरुपम यांनी पक्षाचे नेते मल्लिकार्जुन खरगे यांना लक्ष्य केले आहे. मल्लिकार्जुन खरगे यांच्या विधानावर संजय निरुपम म्हणाले की, शस्त्र पूजा ही अंधश्रद्धा नाही. हे आमच्या परंपरेचे प्रतीक आहे. अडचण अशी आहे की खरगे हे नास्तिक आहे. म्हणून त्यांना हा तमाशा वाटतो. असा विचार करणारे लोक फक्त एक टक्के आहेत. पण त्या एक टक्के लोकांचा विचार कॉंग्रसचा विचार होऊ शकत नाही असं ते म्हणाले.

बुधवारी खरगे यांनी केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारवर टीका केली. त्यावेळी जेव्हा बोफोर्स तोफासारखी शस्त्रे सरकारने आणली तेव्हा त्यांच्या पक्षाने फारसा काही दिखावा केला नव्हता. राजनाथ सिंग यांनी उड्डान भरण्यापूर्वी राफेलची पूजा केली. त्यांनी राफेलवर 'ओम' लिहिलं आणि बचावाचा धागा विमानातही बांधला.AM News Developed by Kalavati Technologies