लवकरच सुरु होणार राममंदिराचे बांधकाम, मंदिर बनवण्यासाठी इंजिनिअर्स अयोध्येत

मंदिराचे बांधकाम होईपर्यंत श्रीरामांची मुर्ती मानस मंदिराजवळ नेण्यात येईल.

अयोध्या| राम मंदिर बांधण्याची आता सर्व तयारी झाली आहे. मंदिर बांधण्यासाठी इंजिनिअर्सचे एक पथक सुध्दा अयोध्येत दाखल झाले आहे. मंदिराचे बांधकाम सुरु होण्याआधी श्रीरामांची मुर्ती दुसऱ्या मंदिरात हलवण्याचा निर्णय सुध्दा घेण्यात आला आहे. मुळ जागेपासून दीडशे मीटर अंतरावर असलेल्या मानस भवनजवळ तात्पुरते एक मंदिर उभारले जाणार आहे. त्यात रामलल्लाला ठेवण्यात येणार आहे.

मंदिराच्या बांधकामाची तारीख आणि इतर महत्वपूर्ण गोष्टींवर लक्ष ठेवण्यासाठी नवीन सदस्यांच्या नेमणुका सुध्दा केल्या जाणार आहेत. राम मंदिराचे पुजारी सत्येंद्रदास यांच्या माहितीनुसार आता ज्याठिकाणी प्रभु श्रीरामांची मुर्ती आहे. त्या ठिकाणी भुयारगृह आहे. मात्र मंदिराचे बांधकाम करत असतांना ही जागा रिकामी करण्यात येईल आणि त्यानंतर मंदिराचे बांधकाम होईपर्यंत श्रीरामांची मुर्ती मानस मंदिराजवळ नेण्यात येईल. मानस मंदिराजवळ एक तात्पुरते मंदिर उभारून त्या ठिकाणी प्रभु श्रीरामाची नियमित पुजा-अर्चना करण्यात येईल.AM News Developed by Kalavati Technologies