खासदार डॉ.अमोल कोल्हे होम क्वारंटाईन

आपल्यामुळे कुणाचे आरोग्य धोक्यात येऊ नये- अमोल कोल्हे

शिरूर । राज्यात कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. या पार्श्वभमीवर राज्य सरकारडून अनेक उपाययोजना सुरु आहेत. यातच कोरोनाग्रस्तांच्या संपर्कात आल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार आणि अभिनेते अमोल कोल्हे यांनी होम क्वारंटाईन व्हायचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भात अमोल कोल्हे यांनी ट्विटवरून माहिती दिली आहे.

शिरूर लोकसभेचे खासदार डॉ. अमोल कोल्हे कोरोना पॉझिटिव्ह नेत्याच्या संपर्कात आल्याने त्यांनी तात्काळ स्वत:ची कोरोना चाचणी करुन घेतली असून ती निगेटिव्ह आलेली आहे. त्यांच्यामध्ये कोरोनाची कोणतीही लक्षणे आढळून आली नाहीत. मात्र पुरेशी खबरदारी घेण्यासाठी मार्गदर्शक सूचनेनुसार होम क्वारंटाईन राहण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे.

डॉ.कोल्हे सार्वजनिक कार्यक्रमात अथवा दौऱ्यावर येतात. त्यावेळी काही वेळा कार्यक्रमांदरम्यान नागरिक सोशल डिस्टन्सिंग पाळत नाहीत. काही जण मास्कचा वापर करीत नाहीत. अशा स्थितीत आपल्यामुळे कुणाचे आरोग्य धोक्यात येऊ नये या भावनेतून त्यांनी होम क्वारंटाईन राहण्याचा निर्णय घेतला असल्याचे समजते.AM News Developed by Kalavati Technologies