पुण्यात बेलगाम घोडागाडीचा थरार, घोड्याला थांबवण्याच्या प्रयत्नात मालकाची कसरत, पाहा व्हिडिओ

घोड्यांना थांबवता थांबवता मालकाच्या नाकी नऊ आले.

पुणे | पुण्यात घोड्याच्या बग्गीचा थरार पाहायला मिळाला. येरवडा परिसरामध्ये शुक्रवारी रात्री ही घटना घडली. बग्गीचे दोन्ही घोडे अचानक सुसाट पळू लागले. यामुळे त्यांना थांबवण्यासाठी बग्गी मालक दुचारीवर स्वार होत त्यांच्यापर्यंत पोहोचला. मात्र घोड्यांना रोखताना तोच चाकाखाली आला आहे. यावेळी घोडे थांबले पण मालक आणि घोडाही जखमी झाले आहेत.

पुण्यात मध्यरात्रीच्या सुमारास ही घटना घडली. घोडे बग्गीसह पळत सुटले. यानंतर त्यांच्यावर नियंत्रण मिळवत असताना हा अपघात घडला. येरवडा परिसरातील ही घटना आहे. बग्गी मालक यामध्ये जखमी झाला आहे. मध्य रात्री समारंभ आवरल्यानंतर या घोड्यांना सुसाट धावायला सुरुवात केली. यावेळी त्या घोड्यांना थांबवता थांबवता मालकाच्या नाकी नऊ आले.AM News Developed by Kalavati Technologies