पुण्याचे महापौर मुरधीर मोहोळ यांना कोरोनाची लागण

कुटुंबातील 8 सदस्यांना देखील कोरोना, संपर्कात आलेल्या मनपा कर्मचाऱ्याचे विलगीकरण

पुणे । पुण्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. महापालिकामध्ये पोहचलेल्या कोरोनामुळे महापौर मुरधीर मोहोळ व त्यांच्या कुटुंबीयांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पण झाले आहे. त्यामुळे पुण्यात आणि महापालिका परिसरात खळबळ उडाली आहे. पुणे शहरात कोरोनाचा शिरकाव झाल्यापासुन मोहोळ हे दिवसरात्र काम करीत होते. विविध भागात फिरणे तसेच अनेक रुग्णालयाला भेट देणे, शहरातील कोरोनाग्रस्त आणि कंटेन्मेट भागातची पाहणी करणे असे काम महापौर मोहोळ करीत होते.
मोहोळ यांनी पावसाळ्यापुर्वी अधिकाऱ्यांसोबत नालासफाई तसेच पावसाळ्यापुर्वी कामाची पाहणी सुद्धा केली होती. त्यादरम्यान त्यांची कोरोना चाचणी दोनदा करण्यात आली होती. मात्र आता तिसऱ्यांदा केलेली चाचणीमध्ये मोहोळ यांचा कोरोना अहवाल हा पॉझिटीव्ह आला आहे. सोबतच त्यांच्या कुटुंबातील इतर आठ सदस्यांना सुद्धा कोरोनाची लागण झाली आहे.
महापौरांच्या संपर्कात आलेल्या मनपातील आय.ए.एस. अधिकाऱ्यांसह मनपा प्रमुख यांना विलगीकरण करण्यात आले आहे.AM News Developed by Kalavati Technologies