पुणे जिल्ह्यात मागिल 24 तासात एकूण 358 नवे कोरोनाग्रस्त रुग्ण

आता पुण्यातील कोरोनाग्रस्त रुग्णांची एकूण संख्या 5167 एवढी झाली आहे.

पुणे | पुण्यातील कोरोना बाधितांची संख्या सातत्याने वाढत आहे. गेल्या 24 तासात 358 नवे कोरोना रुग्ण आढळले आहे. तर पुणे जिल्ह्यात मागील 24 तासात कोरोना व्हायरसने 15 रुग्णाचा घेतला बळी. आता पुण्यातील कोरोनाग्रस्त रुग्णांची एकूण संख्या 5167 एवढी झाली आहे.

पुणे जिल्ह्यात आतापर्यंत एकूण 257 रुग्णाचा कोरोना व्हायरसने बळी घेतला आहे. तर एकूण 218 कोरोना रुग्ण गेल्या 24 तासात बरे झाले आहेत. पुण्यात आतापर्यंत एकूण 2770 कोरोना वायरस ग्रस्त रुग्ण आजार मुक्त झाले आहे.AM News Developed by Kalavati Technologies